Jio Meet काय आहे ?
जियो मीट काय आहे ? आपल्याला माहिती आहे की काय आहे हे Jio Meet App? आजचा आपला Article या विषयी च आहे. आज आपण जाणून घेऊ की हे ॲप काय आहे, त्याचा उपयोग काय होतो, हे ॲप डाऊनलोड कसे करतात. आणि या विषयी बरीच माहिती. २०२० च्या सुरुवातीपासून लागलेल्या lockdown मूळ शाळा, महाविद्यालय, कंपणीज,मोठ - मोठे बिझनेस हे पण बंद झाले. पण हे सर्व अति महत्त्वाचे विषय असल्या कारणाने ते काहीही करून चालू ठेवणे महत्त्वाचे होते. सगळ्याच टेक्निकल कंपनीज कामाला लागल्या की या Lockdown च्या काळात सुद्धा एखादे असे ॲप बनवावे की साधन मात्र एक पण एका वेळी खूप जण चर्चा करू शकतील, एकमेकांचे विचार मांडू शकतील. सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी असलेली Reliance Jio ने आपला नवीन ॲप लॉन्च केला Jio Meet नावाने. हे एक व्हिडिओ कॉन्फरन्स ॲप आहे. हे Reliance Jio च्या compatitors साठी आणि सर्वांसाठीच आश्चर्याची बाब होती की ही सर्व्हिस एकदम मोफत असणार आहे. सध्या भारतातील video Conferencing Apps - Google Meet, Zoom, Microsoft Team यांसोबत Jio Meet ची चांगलीच टक्कर होऊ शकते. म्हणून आम्ही विचार केला की Jio Meet विषयी एक आर्टिकल लिहून त्याविषयीची आम्हाला माहिती असलेली माहिती आपल्या पर्यंत पोहोचवली पाहिजे. तर चला तर मग आता वेळ न दवडता आपण जाणून घेऊया Jio Meet विषयीची अजून माहिती. Jio Meet हे एक फ्री व्हिडिओ कॉन्फरन्स ॲप आहे. भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी Reliance Jio ने लॉन्च केला आहे. या ॲप ची खास गोष्ट म्हणजे हे ॲप सगळ्याच युजर्स साठी एकदम विना शुल्क असणार आहे. Reliance Jio ने Jio Meet ची सर्व्हिस लॉन्च केली ३० एप्रिल २०२०, तेव्हा ते सगळ्या युजर्स साठी उपलब्ध नव्हतं. टेस्टिंग साठी फक्त Beta युजर्स साठी रिलीज केलं होत. पण कमी काळात Jio Meet App एवढा पॉप्युलर झाला की या ॲपला टेस्टिंग काळातच जवळपास तब्बल १,००००० लोकांनी याला डाऊनलोड केला होता. • Jio Meet डाऊनलोड कसे करतात ? आता जाणून घेऊया की Jio Meet कसे व कोठून डाऊनलोड करतात. सध्या हे ॲप Google Play Store व Apple App Store या दोन ठिकाणीच उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी आपल्या कडे जर Android मोबाइल असेल तर Play Store वर आणि जर Apple मोबाइल असेल तर App Store वर वरील बाजूस सर्च बार मधे Jio Meet नावाने सर्च करायचा आहे. सर्च झाल्यानंतर तिथे आपल्या प्रमाणे डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करायचा आहे. Jio Meet आपल्या device मधे इंस्टॉल झाल्यानंतर याला सेटअप करणे पण खूप सोपे आहे. ते कसे करतात हे आपण पाहू. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाइल नंबर चा वापर करून अकाउंट काढावे लागते त्या साठी तिथे आपला मोबाईल नंबर नमूद करायचा आहे मग आपल्या मोबाइल वर एक OTP येईल तो या ॲप वर नमूद करावा लागतो, लगेच आपल्या नावाने Jio Meet चे खाते उघडते आणि आपण Meeting ही करू शकतो. ∆ Jio Meet चा वापर कसा करायचा ? Jio Meet चा वापर करणेही अगदी सोपे आहे. आपल्याला एक दोन वेळा याच्या वापराने सहज लक्षात येईल. आपण Sign In करू शकतो Company Domain चा वापराने. Jio Meet वापराच्या steps खालील प्रमाणे वापरायचा आहेत. १). Open करा Jio Meet App किंवा visit करा https://jiomeetpro.jio.com २). “Sign In” page ला क्लिक करायचा आहे. ३). या पेज वर “Company Domain” option वर क्लिक करायचा आहे. ४). आता Enter करायचंय आपल्या Domain ID किंवा पूर्ण Email address ५). जर आपल्याला आपली Domain ID माहिती नसेल तर , click करा “I don’t know my company domain” option -> मग येथे टकायचाय आपला जुना Email Address 6. मग “Continue” वर क्लिक करायचा आहे. • Jio Meet पासून मिळणाऱ्या सुविधा १). Jio Meet App वरून युजर्स सहजपणे One-on-One कॉल व conference कॉल करू शकतात. एका मीटिंग मधे तब्बल १०० जण एकाच वेळी कॉन्फरन्स कॉल द्वारे जोडता येतात. २). Jio Meet ॲप मधे एखादा नवीन participant Sign-In केल्याशिवाय मीटिंग Join करू शकतो. युजर ला फक्त Meeting-ID किंवा पर्सनल लिंक चा वापर करून meeting join करता येते. ३). Jio Meet आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त म्हणजे Unlimited Conference call ची सुविधा देते. म्हणजे एक मीटिंग १०० जण न थांबता २४ तास ही करू शकतात. ४). Jio Meet ची Enterprise-Grade Host Controls मधे आपल्याला खूप सारे features मिळतात जसे की Meetings साठी Password Control, multi-device login support, Screen Sharing feature, waiting room, Meetings Schedule करण्याची सुविधा आणि बरेच काही. • Devices जे Jio Meet App ला Support करतात. १). Android Devices ५.० च्या पुढचे version. २). iOS Devices ३). Windowas १० ४). Mac Devices १०.१३ च्या पुढचे version. आम्ही आशा करतो की Jio Meet विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील. !! धन्यवाद !! |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत