माझी माहिती

माझी माहिती

WHAT IS RAM IN MARATHI

 



             आपण सर्वांनी RAM हा शब्द खूप वेळा ऐकला आहे. Technology च्या या दुनियेत तर RAM चे महत्व खूपच जास्त वाढले. जर आपण एखादा मोबाईल किंवा कॉम्प्युटर घ्यायला दुकानात गेलो तर सर्वात अगोदर त्याची Ram विचारतो. तर काय आहे बाबा ही RAM ? चला तर मग जाणून घेऊया राम बद्दल.

अनुक्रम :

१) What is RAM ?
२) याला Random Access Memory का म्हणतात ?
३) RAM ची विशेषता ?
४) RAM चे प्रकार ?
५) RAM जास्त असल्याचे फायदे काय ?   
६) MOBILE RAM व PC RAM यातील अंतर -



WHAT is RAM ?

RAM - ( Random Access Memory )
            RAM म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा अगदी कॉम्प्युटर चा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू, तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून होत असते.

RAM आणि ANDROID जेव्हा आपण एखादे APP डाऊनलोड आणि इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे प्रथम ते अ‍ॅप रॅममध्ये साठवले जाते आणि नंतर इन्स्टॉल होते.

RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . RAM ही Volatile मेमोरी आहे यामुळे PC बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .
१) Static Ram
२) Dynamic Ram.
Static Ram ला एखादी माहिती भेटली की ती PC जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते .

जेव्हा आपण कॉम्प्युटर किंवा मोबाइल वर गेम खेळतो, मूव्ही पाहतो, गाणे ऐकतो अजून बरेच काही करतो. या सर्व क्रियांसाठी जागा पाहिजे म्हणजेच Space पाहिजे. ही Space म्हणजेच RAM होय.
जेवढ आपण जास्त Application एकाच वेळी चालवू किंवा open करू तेवढा जास्त ram चा वापर झाल्यामुळे, त्या device ची स्पीड कमी होते म्हणजेच तो device स्लो होतो. म्हणून आपण जास्त RAM चे Device साठी मागणी करतो. कारण RAM जेवढी जास्त तेवढा तो device फास्ट.


याला Random Access Memory का म्हणतात ?

RAM हा cells चा बनलेला असतो, आणि प्रत्येक cell या Rows आणि columns नी बनलेल्या असतात. आपला जो data असतो तो RAM मधील cell मधे साठवला जातो. ज्याचा एक Unique Address असतो, ज्याला cell path म्हणतात. CPU या cell पासून data वेगळा - वेगळा प्राप्त करू शकतो. आणि तेही वीणा sequence. त्यामुळे RAM मधील data ला Randomly Access केला जाऊ शकत, यामुळेच या मेमोरी ला Random Access Memory म्हणतात.

RAM ची विशेषता ?

• Ram ला कॉम्प्युटर ची वर्किंग मेमोरी म्हणतात.

• या मेमोरी ला CPU वापरतो.

• RAM Volatile Memory आहे.

• जेव्हा Device बंद होतो तेव्हा ही मेमोरी रिकामी होते.

• ही मेमोरी Secondary Memory पेक्षा खूप जास्त जलद आहे.

• या मेमोरी ची Capacity Secondary मेमोरी पेक्षा कमी आहे.

• सगळे प्रोग्राम, Application, इन्स्ट्रक्शन RAM मधेच चालतात.

• RAM ही महाग असते दुसऱ्या मेमोरी चा तुलनेत.

या आहेत RAM च्या विशेषता आता आपण जाणून घेऊया की Rअम चे प्रकार.

RAM चे प्रकार ?

आता पर्यंत आपण पाहिलं की RAM म्हणजे काय आता बघू RAM किती प्रकारची असते.

RAM ही मुख्यतः २ प्रकारची असते

१) STATIC RAM -
                          याच्या नावातच समजून जाते की ही स्थिर असते. म्हणजेच यात data तोपर्यंत राहतो जोपर्यंत device चालू राहतो. याला SRAM on म्हणतात. ही चिप ६ ट्रांसिस्टर चा वापर करतो. याला सारखं रिफ्रेश करण्याची गरज लागत नाही, यातला data स्थिर राहतो. समान size चा data साठवण्यासाठी SRAM ला DRAM पेक्षा जास्त चिप्स लागतात. म्हणून DRAM पेक्षा SRAM महाग भेटते.

∆ STATIC RAM ची वैशिष्ट्य -

• STATIC RAM खूप जलद असते.

• याची SIZE जास्त असते.

• विजेचा जास्त वापर

• या मेमोरी चा Cache मेमोरी साठी वापर होतो.

• या मेमोरी ला सारखं रिफ्रेश करण्याची गरज नसते

• खूप दिवस चालते.


२) DYNAMIC RAM

                     DYANAMIC RAM ला DRAM सुद्धा म्हणतात.
ही RAM SRAM च्या पूर्ण विरुद्ध असते.
याला सारखं रिफ्रेश करण्याची गरज असते, जर data ला तसाच ठेवायचा असेल तर. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा DRAM ला एका रिफ्रेश सर्किट शी जोडल्या जाईल. DRAM ही एक Transistor आणि एक Capacitor यांपासून बनते.

∆ DYNAMIC RAM ची वैशिष्ट्य -

• DYNAMIC RAM स्लो असते SRAM च्या तुलनेत.

• SIZE कमी असते.

• विजेचा वापर कमी

• SRAM प्रमाणेच DRAM सुद्धा Cache मेमोरी साठी वापर होतो.

• या RAM ला सारखं रिफ्रेश करण्याची गरज असते.

• खूप कमी दिवस चालते.

∆ RAM जास्त असल्याचे फायदे काय ?       

                       RAM जास्त असल्यावर कशा प्रकारे काम जलद होते ते आपण एका उदाहरणातून पाहूया.

उदाहरण :

समजा CPU core हा एक गवंडी आहे. याप्रमाणे जर Dual core CPU मधे एका सोबत २ गवंडी काम करत आहेत. याचप्रमाणे Quad core CPU मधे ४ गवंडी काम करत आहेत, म्हणजेच CPU मधे core जेवढे जास्त तेवढेच होणारे  काम जलद होईल. येथे आपण RAM ला काम करण्याची जागा समजू. म्हणजेच जेवढी जास्त RAM असेल तेवढे काम करण्यासाठी जागा मिळेल.

याचप्रमाणे आपण Hard Drive ला Storage Area समजू, जेथे गवंडी चे कामासाठी लागणारे सगळे सामान ठेवलेले असते. म्हणजेच RAM जेवढी जास्त तेवढेच काम करण्यासाठी जागा जास्त.

आपल्याला या उदाहरण वरून लक्षात आलेच असेल की RAM जास्त असेल तर कार्य करण्याची क्षमता आणि स्पीड दोन्ही जास्त असतात. हे कॉम्प्युटर चालवताना आपल्याला नक्कीच जाणवते.

MOBILE RAM व PC RAM यातील अंतर -

• कॉम्प्युटर मधे PCDDR आणि जास्त तर
•  मोबाइल प्रोसेसर  मधे LPDDR चा वापर केला जातो.

• LPDDR - Low-Power Double Data Synchronous ram
• PCDDR - Standard Double Data Synchronous RAM

• Mobile RAM ला Power Save करण्यासाठी तर
• PCRAM ला Performance वाढवण्यासाठी वापरले जाते.

• जास्त तर मोबाईल Processors ना Arm Architecture चा वापर करून डिझाईन केले आहे. याला खास करून Performance आणि Power यातील Balance बनवण्यासाठी तयार केलेला असत.
• PCRAM ला Intels x८६ Architecture च्या हीशोबानी बनवला आहे.


आम्ही आशा करतो की RAM विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.

!! धन्यवाद !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.