माझी माहिती

माझी माहिती

WHAT IS PIN CODE in MARATHI ?

WHAT IS PIN CODE in MARATHI ?






                 जेंव्हा आपल्याला आपला संदेश पत्र किंवा चिठ्ठी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा अजून काही कामा निमित्त पाठवायची असेल तर त्या साठी आपल्याला त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता माहीत असणे गरजेचे आहे. पण जर एकाच नावाचे २ गाव असतील तर मग ती चिठ्ठी नेमकी कोणत्या गावात जाणार ? या अडचणी येऊ नयेत म्हणूनच पिन कोड ची निर्मिती करण्यात आली.

                    पूर्वीच्या काळात दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवणे सोपे नव्हते. कबुतर हे संदेशवहनासाठी चांगले माध्यम मानले जाते. कबुतराला दिशा तसेच स्थानांचे नेमके ज्ञान असते. त्याला प्रशिक्षण दिल्यास ते विशिष्ट ठिकाणी जा-ये करून संदेशांची देवाणघेवाण करू शकते.नल तसेच दमयंतीने आपल्या संदेशांची देवाणघेवाण हंसामार्फत केली होती.पिन कोड च्या साहाय्याने अचूक आणि नेमके ठिकाण शोधणे खूप सहज झाले. चला तर मग आणखी कशा प्रकारे पिन कोड आपणास उपयुक्त आहे ते आपण पुढे पाहूया.

अनुक्रम :

१) पिन कोड काय आहे ?
२) पिन कोड ची ओळख
३) Sorting District काय आहे ?
४) Service Route काय असत ?
५) Delivery Office म्हणजे ?
६) थोडीशी Xtra माहिती

∆ पिन कोड काय आहे ?

PIN  - POSTAL INDEX NUMBER

पिन कोड यालाच Zip code सुद्धा म्हणतात. हा कोड ६ अंकी असून याचा उपयोग पोस्ट ऑफिस शोधण्यासाठी होतो.

इंग्रजांच्या काळात भारतात पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ डिपार्टमेंट या नावाने १ ऑक्टोबर १८५४ रोजी पोस्टाची सेवा सुरू झाली.

हा कोड १५ ऑगस्ट १९७२ रोजी Shriram Bhikaji Velankar ( Additional Secretary - Union Ministry of Communication ) यांनी introduce केला व संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. वेलणकर हे संस्कृत तसेच पाली भाषांचे अभ्यासकही होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी.

                        संपूर्ण देशात पिन कोड चे ९ regions मधे विभाजन करण्यात आलेले आहे. त्यातील सुरुवातीचे ८ Resions geographical Resions आहेत, व १ resion आर्मी पोस्टल सर्व्हिस साठी राखून ठेवला आहे.
पिन कोड च्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचविणे अगदी सोपे झाले, जे अगोदर manually Sorting करणे लागत होते ते या कोड मुळे सोपे झाले या मुळे वेळ ही वाचला त्यामुळे संदेश लवकर पोहोचू लागला व अचूक ठिकाण शोधणे शक्य झाले.


∆ पिन कोड ची ओळख -

 पिन कोड हा ६ अंकी असून त्यात
             
१ ला अंक हा resion किंवा zone साठी असतो.
२ रा अंक हा sub zone साठी
३ रा अंक Sorting District साठी
४,५,६ हे अंक individual Post Office साठी

या प्रकारे पिन कोड ची विभागणी करण्यात आली आहे यामुळे नेमके आणि अचूक पोस्ट ऑफिस शोधणे शक्य होते.

पोस्टल झोन कोण - कोणते आहेत व त्यांची विभागणी कशाप्रकारे केली. व या ९ रेशन मधे आपला resion किंवा zone कुठे आहे ते आपण पाहूया





∆ Sorting District काय आहे ?

पिन कोड च्या ३ ऱ्या अंकाला जेव्हा सुरुवातीच्या २ अंकांसोबत जोडतो तेव्हा हे ३ अंक मिळून एक Specific Geographical Resions दर्शवते त्यालाच Sorting District असे म्हणतात.

टीप : हे आर्मी च्या ९ व्या  Functional Zone साठी लागू होत नाही.

एका राज्यात एका पेक्षा जास्त sorting District असू शकतात. ते ठरते या ठिकाणी येणाऱ्या पार्सल वर जर जास्त mail येत असतील तर एका पेक्षा जास्त ही असू शकतात.

आता आपण पाहूया की प्रत्येक राज्यासाठी resion साठी कोणता पिन आहे.







∆ Service Route काय असत ?

पिन कोड च्या ६ अंका पैकी ४ था अंक हा Service Route दर्शवते. म्हणजेच Delivery Office Locate करत त्या Sorting District मधल.

∆ Delivery Office म्हणजे ?

पिन कोड च्या ६ अंका पैकी ५ व ६ वा अंक हा Delivery Office दर्शवितात. यांची सुरुवात ०१ पासून होते GPO ( General Post Office ) किंवा HO ( Head Office ) च्या.

Delivery office ची नंबरिंग नियोजित प्रकारे रचलेली आहे. जे नवीन Delivery Office aahet त्यांना मोठ्या संख्या दिल्या जातात.

जर एखाद्या डिलिव्हरी ऑफिस मधे जर mail चा बोजा जास्त असेल  जे की ते डिलिव्हरी ऑफिस त्याचा भार एकटा नाही सांभाळू शकत त्या वेळेस एक नवीन डिलिव्हरी ऑफिस तयार केली जाते व पुढील उपलब्ध संख्या त्या office ला दिली जाते. या दोन्ही जवळ-जवळ असलेल्या ऑफिस चे सुरुवातीचे ४ अंक सारखेच असतात.


∆ थोडीशी Xtra माहिती

• भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई येथील जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) असून, तेथे १०० पेक्षा जास्त काउंटर्स आहेत. त्याचा पिन ४००००१ आहे.
• सर्व स्त्री कर्मचारी असणारे पोस्ट ऑफिस शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे २०१३ साली सुरू झाले. त्याचा पिन ११० ००१ आहे.
• भारतात एकूण १९,१०१ ‘पिन’ आहेत.
• पोस्टातर्फे पोस्टल आयुर्वमिा, मनीऑर्डर, स्पीड पोस्ट, बुक पोस्ट यांसारख्या सुविधा अतिशय किफायतशीर दरात व खात्रीलायकरीत्या पुरवल्या जातात.
• हल्ली पोस्टल बँकही सुरू करण्यात आली, ज्याद्वारे एटीएमचीही सोय झाली आहे.
• भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
• जगातील सर्वात उंचावर असणारे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहूल व स्पिती जिल्ह्य़ात हिक्कीम येथे आहे.



आम्ही आशा करतो की पिन कोड विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.

!! धन्यवाद !!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.